विरोध आणि विद्रोह यातला फरक काय? किंबहुना हा फरक माहित नसल्यामुळंच काही लोक आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून देतात. Let me come to the point.
विरोध म्हणजे व्यवस्थेच्या अधीन राहून दर्शविलेली असहमती. विद्रोह म्हणजे व्यवस्थेच्या बाहेरून दर्शविलेली असहमती. दोन्ही मध्ये कमी अधिक प्रमाणात तत्व किंवा मुद्दा हाच असहमतीचा मूलभूत घटक असतो. पण आजकाल विद्रोहाचा विपर्यास करणंच सुरु आहे. ज्यामध्ये तत्वाला हरताळ फासून फक्त संधीसाधूपणा केलेला असतो. अर्थात हे सगळं सेटलमेंट साठीच. जणू काही फक्त आपणच विद्रोही विचारसरणीचे एकमेव समर्थक आहोत या अविर्भावात. तेही विद्रोहाचा अर्थ माहित नसताना. चळवळीच्या नावाखाली निरर्थक वळवळीचे उद्योग सुरु आहेत. आपण विरोधाच्या कोणत्या प्रकारात बसतो हे ज्याचं त्यानं तपासून पाहावं. यामधील योग्य काय हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की आपण जे करतोय त्याचे विपरीत परिणाम तर होत नाहीयेत ना. जास्त काही नाही पण विद्रोहाचा विपर्यास केला जातोय हे मात्र नक्की. अशा या विपर्यासरुपी रोगाला वेळीच आवर घालणे संयुक्तिक ठरेल. लोकशाहीच्या तथाकथित रक्षकांनी ही गोष्ट नजरेआड करता कामा नये.