Friday, 28 April 2017

नाकर्त्यांचे बोल

आजकाल नाकर्ते अपात्र लोक मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका करतायत. म्हणून त्याबद्दल थोडंसं लिहितोय.
सुरुवात खास मुख्यमंत्री फडणवीसांच्या शैलीत...
"
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीस हे कोणाच्या वहाणा उचलून, शिफारशिवरून, घराणेशाहीतून अथवा हुजरेगिरी करून मुख्यमंत्री झालेले नाहीत. ते कर्तृत्वावर, बुद्धीवर आणि क्षमतेवर मुख्यमंत्री झाले आहेत. कदाचित ही अपवादात्मक गोष्ट असल्याने सगळं आयुष्य सेटलमेंट मध्ये गेलेल्यांना दुःख होणं साहजिक आहे."
अभ्यास चालू आहे हा मुद्दा गाजतोय. पण जरा सविस्तर विश्लेषण करू. पूर्वीच्या निर्बुद्ध लोकांनी अभ्यास केला नाही म्हणून तर जनतेला अभ्यासू कार्यक्षम पर्याय द्यायची वेळ आली. जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, ऑनलाईन दाखले ही त्याच अभ्यासू डोक्यातील कल्पना. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावलेत. परिणाम दिसायला वेळ लागेल. पण काम सुरूच आहे. विषय इतके व्यापक आहेत की त्याला वेळ लागणारच. अविचारी निर्णय घ्यायचे नाहीयेत. 60 वर्षे हे लोक दलदलीतल्या म्हशीसारखे ढिम्म बसले म्हणूनच आज वेळ लागतोय. फक्त गुंतागुंत करून ठेवलीय प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं तूर्तास विरोधकांनी सांगावं की आमच्या मराठा आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं ते कोर्टात का टिकलं नाही? 2009 ला इतकी कर्जमाफी दिली तरी आमचा बळीराजा परत कर्जबाजारी का झाला? मुळात बळीराजा खरंच कर्जमुक्त झाला होता का? एवढया मोठ्या तोंडानं संघर्षयात्रा काढतायत, पण किती सधन शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची पाणीपट्टी थकवलीय याचा अभ्यास आहे का? अनेक जिल्हा बँका 2014 पूर्वीच डबघाईला का आल्या? एवढे वर्ष सत्ता शोषून हा अभ्यास नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासावर बोलायचा काय अधिकार आहे? असं करणे म्हणजे नापास आणि वाया गेलेल्या विद्यार्थ्याने प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यावर शंका घेण्यासारखे नव्हे काय? विरोधकांनी त्यांचा अभ्यास झाला असेल तर जनतेला अहवाल सादर करावा.
जातीय टिकेबद्दल बोलायचं झालं तर इतका कसला जातीय द्वेष आहे? हाच तुमचा पुरोगामी महाराष्ट्र का? जातीय टीका करणारे स्वतःच्या जातीचे पाईक नाहीत. कोणत्याच जातीमध्ये कोणाचा द्वेष करा असं शिकवलेलं नाही. जात शरीरयष्टीवर बोलून आपण आपले संस्कार दाखवून देतो. किमान असल्या वागण्याने आपल्या सज्जन समाजबंधूंना तरी माना खाली घालायला लावू नये.
साधे Graduation पर्यंतचे विषय सोडवताना दमछाक होणारे लोक आजकाल दुसऱ्याची बुद्धी मोजत आहेत. काही लोक तर बांडगुळासारखे दुसऱ्यानं टाकलेल्या तुकड्यावर जगून प्रकाशझोतात आले. अशा पाकिटमार लोकांपेक्षा भिकारी परवडले. किमान ते खुलेआम तरी भीक मागतात. विकास करण्यात आपण 'सहकुटुंब अनुत्पादक' राहिलो म्हणजे बाकीचे पण तसेच राहणार असं होत नाही ना.
मोठं काम करताना त्रुटी राहू शकतात. ते 'देवेंद्र' असले तरी माणूसच आहेत. त्रुटी जरूर दाखवा. त्या सुधारून काम करण्याची क्षमता असणारे मुख्यमंत्री सुदैवानं लाभले आहेत. मुद्दा एवढाच आहे की त्रुटी दाखवून द्यायला अभ्यास लागतो. जात लागत नाही. नुसतं दुसऱ्याच्या अभ्यासावर बोट ठेवून आपण अभ्यासू होत नाही. स्वतःचा अभ्यास मुद्दे लागतात. कारण नाकर्त्यांच्या शब्दांना किंमत शून्य असते. आता तरी या 60 वर्षांच्या नाकर्त्यांनी सुधारावं हीच अपेक्षा.

By Sanket
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित...

Sunday, 23 April 2017

'खड्डयातील महानगरपालिका'

सांगली, मिरज, कुपवाड ही महाराष्ट्रातील '' वर्गवारीत असणारी महानगरपालिका. '' वर्गवारी वेगळ्या निकषावर असली तरी इथला कारभार '' वर्गवारीपेक्षाही सुमार आहे. तळीरामांसाठी PWD कडून रस्ते हस्तांतरासाठी नको तेवढी तत्परता दाखवणाऱ्या मनपांपैकी एक. ज्यांना साधा महानगरपालिकेच्या समोरचा रस्ता नीट करता येत नाही त्यांनी PWD चे रस्ते मागणे म्हणजे आपली मुलं नीट सांभाळू शकणाऱ्या पालकांनी आणखी मुलं दत्तक घेण्याचा प्रकार झाला.
उदाहरणार्थ, मनपा मुख्यालयासमोरचा हरभट स्ता इथल्या कारभाऱ्यांना दिसत नसावा. अगणित खड्डे, वर-खाली असलेली मॅन होल्स, बेशिस्त पार्किंग प्रचंड वाहतूक कोंडी अशी या रस्त्याची दुरावस्था. मनपा कृपेने सांगलीत प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांचं असं विचित्र स्वागत आपल्याला करावं लागतं. असे अनेक रस्ते दाखवता येतील. मूळ गावातले रस्ते असे. विस्तारित गुंठेवारी भागातली तर चर्चाच नको. रोड रजिस्टर वगैरे ज्ञानाची अपेक्षाच नाही.
Street lights
बद्दल तर बोललेलंच बरं. वर पाहिलं तर लाईट लागलेले दिसतात. पण रस्त्यावर प्रकाश शून्य. पाणी तर आम्ही कृष्णामाई ऐवजी शेरीनाल्याचंच पितो. जणू काही तेच पाणी पिण्यासाठी आम्ही जन्माला आलोय. त्या धुळगांव योजनेच्या नावावर अजून किती निवडणुका होणार आहेत ते देव जाणे. दरवर्षी बजेट फुगवण्यापालिकडं यांनी काही केलं नाहीये. मनपाला 19 वर्षे झाली तरी 19 महिने झाल्यासारखी अवस्था आहे.
स्वच्छता अभियानात आम्ही किती मागासलेले आहोत त्याबद्दल एक जुनी सत्य घटना सांगतो. एका सन्मानीय नगरसेवकांसोबत काही सामाजिक विषयांवर चर्चा करताना अशी माहिती कळली की ACC सिमेंट कंपनीने पुढाकार घेऊन घनकचरा प्रकल्पाबद्दल एक बैठक बोलावली होती. त्यासाठी सगळ्या मनपा पदाधिकाऱ्यांना बोलावणं पाठवलं होतं. पण तत्कालीन महापौर त्या बैठकीला गेले नाहीत त्यामुळं ती बैठक रद्द झाली. कारण काय तर या महाशयांना 'रीतसर' आमंत्रण नव्हते म्हणे. शहर विकासासाठी आमंत्रण कसले लागते? किती तुच्छ मानसिकता आहे? फोडाफोडीचे 'पॅटर्न' राबवताना आमंत्रण लागत नाही वाटतं. शहर विकास करण्यासाठी सभागृहात आलेल्यांना हे शोभत नाही.
प्रश्न अनेक आहेत. एकाच लेखात सगळं मांडून होणार नाही. तूर्तास ज्या पक्षविरहित संघटना आवाज उठवतायत त्यांचे आभार मानून त्यांना साथ द्यायला हवी(उदा,जिल्हा सुधार समिती, आदी). शिवाय ज्या बुद्धिजीवी लोकांना शहर विकासात योगदान द्यायचं आहे त्यांनी 'खोबरं तिकडं चांगभलं' या उक्तीपलिकडं जाऊन काम करावं. बुद्धी गहाण ठेवण्यात काही अर्थ नसतो. नपेक्षा काम केलेलं बरं.
थोडं पक्षीय राजकारणापलिकडं जाऊ. डबक्यात किती दिवस राहायचं? डबक्या बाहेरचं जग पाहू. एवढीच अपेक्षा आहे की यापुढं तरी सांगलीकरांनी चांगले प्रतिनिधी निवडून द्यावेत. आपणच निवडून द्यायचं आणि आपणच खडी फोडायची हे बरं नव्हे. अन्यथा सर्व प्रकारच्या खड्डयातलीच वाटचाल आपल्या वाट्याला येईल.
By Sanket
खास आपल्या सांगलीकरांसाठी...
Also Published in Daily Tarun Bharat Sangli Edition on 5 May 2017

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...