एक प्रश्न मनात आला की आपण डोळसपणे वागतो का अंधपणे? खरंच काही दम आहे का आपल्यात? मग काही प्रश्न पडायला लागले आणि उत्तरं सुद्धा मिळाली. त्यातल्या काही गोष्टी शेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरच्यांचा सुद्धा यात मोठा वाटा आहे. आपण civil engineer आहोत तर काही तरी constructive केलं पाहिजे हे मनात होतं. मी काय केलं यापेक्षा काय करता येऊ शकतं हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.
गेल्या दीड वर्षाचा आढावा-
1. सगळ्यात आधी माझ्या घरातले CFL बल्ब बदलून LED केले. थोडं बिल नक्कीच कमी झालंय. (ते सुद्धा डिजिटल पेमेंटनंच खरेदी केलेत)
2. माझ्या हातून कोणताही कचरा रस्त्यावर टाकला नाही. कचरा झाला तर तो खिशात किंवा गाडीमध्ये ठेवून नंतर एका कचरा पेटीत टाकला. पूर्वीही रस्त्यावर टाकत नव्हतो. पण अनावधानाने व्हायचं ते ही बंद झालं. एक आतून feeling असतं ना की असं नाही करायचंय आपल्याला.
(मला हे तेव्हा जास्त जाणवलं जेव्हा मी कार साफ करत होतो आणि ड्राइव्ह करताना खाल्लेली अगदी चॉकलेटची कागदं सुध्दा मला सापडली. आणि गाडीतली एक पिशवी अशा प्रकारच्या कचऱ्यानं खचाखच भरली होती. विचार करा किती कचरा बाहेर फेकला गेला असता.)
3. गेलं दीड वर्ष जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट करतोय. माझी 4 इ-वॉलेट आहेत. जिथं चांगली ऑफर आहे तिथून पेमेंट करतो. ऑफर नसली तर जिथं पैसे आहेत तिथून पेमेंट करतो. खूप कॅशबॅक सुद्धा मिळाला.
4. नोटाबंदीनंतर पेट्रोल सुद्धा कार्डनं भरायला सुरुवात केलं. जर पंपावर मशीन बंद असेल तर फक्त 50-100 रुपयांचंच पेट्रोल भरतो.
5. कुठंही हॉटेल, कॉफी शॉपमध्ये गेलो की पहिला प्रश्न असतो कार्ड चालतंय ना? 70% वेळा तरी कार्ड पेमेंटच केलंय. जशी सगळीकडं मशिन येतील तसं ते प्रमाण 100% वर नेईन.
6. आपल्याकडे किती कॅश आहे आणि खर्च किती याचा अंदाज घेऊन कॅश वापरतो. त्यामुळं नोटांची चणचण भासत नाही आणि कोणाच्या नावानं खडी सुद्धा फोडायला लागत नाही.
7. गेली 6 वर्षे माझ्या घरातील प्रत्येक two wheeler 3-4 महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करून घेतो. ज्यामुळं गाडी नेहमी फिट राहते व चांगलं एवरेज देते. माझंही पेट्रोल वाचतं आणि पर्यायानं देशाचंही. किमान खारीचा वाटा.
8. मागच्या वर्षी बागेत 6-7 झाडं लावली त्यातलं एकच झाड वाचलं नाही फक्त. बाकी मस्त आली आहेत. पूर्वीची तर आहेतच. यावर्षी सुध्दा 10-15 झाडं लावणार आहे. (त्यातलं एक झाड खास दिवंगत अनिल माधव दवेंसाठी असेल). Already बागेची मशागत करून ठेवली आहे.
9. आमच्या घरातले सदस्य झाडाजवळच्या हौदावर छोट्या मडक्यात पक्ष्यांसाठी नेहमी (12 महिने) पाणी भरून ठेवतात. हे अगदी आजी-आजोबांपासून सुरू आहे. आमच्या घरात आलेला पक्षी देखील तहानेनं परत जाणार नाही.
10. घरातल्या गाड्या धुताना अंगणातच धुतो. त्यामुळं किमान 70% तरी पाणी परत झाडांना मिळतं. जास्त पाणी वाया जात नाही. (गाड्या धुवायच्या पाण्यात साबण वा केमिकल घालत नाही.)
11. नोटाबंदी झाली तेव्हा गोव्यात होतो. दुसऱ्या दिवशी निघणारच होतो. 500 आणि 1000 च्या नोटा जवळ होत्या. 100च्या फक्त 4 नोटा जवळ होत्या. त्या पुरवत सांगलीत पोहोचलो. कसलीही अडचण आली नाही. स्वतःच्या खर्चावर कंट्रोल ठेवला फक्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाला शिव्या देत बसलो नाही. कशाला शिव्या देऊ? प्रवासात होणारा अवाजवी खर्च वाचला ना राव.

एवढं analysis केल्यावर उत्तर मिळालं...
"होय..मी मोदीजींचा 'डोळस' follower आहे"
यातल्या अनेक गोष्टी मोदींनी 'मन की बात' मध्ये सांगितल्या आहेत. काही आधीपासूनच करत होतो. काही नंतर सुरू केल्या. प्रत्येक व्यक्ती अंध follower असत नाही. उलट अतिटीका करण्याच्या नादातच आपण अंध होऊ शकतो.
हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच आहे की स्वतः पासून बदलाला सुरुवात करूया. नक्की देश बदलेल. राजकारण्यांना शिव्या देऊन, त्यांच्या चुका दाखवून आपली जबाबदारी संपत नाही. ज्यांना फॉलो करतो त्यांच्या काही 'चांगल्या' गोष्टी आचरणात आणू. मग तो कोणताही नेता असू दे. त्यांचा नुसताच उदोउदो करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टी implement केल्या तर त्यांनाही बरं वाटेल. अर्थात तो नेता त्या पात्रतेचा असावा म्हणजे झालं. नाहीतर follow करण्याच्या नादात घोटाळे पण कराल.
मी काही फार मोठं केलं नाहीये. अजून खूप काही करायची इच्छा आहे. Step by step करेनच. एक चांगला अनुभव आहे. त्याचा माझ्या देश बांधवाना काही फायदा झाला तर होऊ दे म्हणून शेअर केलं. तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असला तरी माझ्यासाठी सगळ्यात आधी देश बांधव आहात. "ग्यान बाटने से बढता है" यावर माझा विश्वास आहे.

आता मला भक्त म्हणा किंवा काहीही म्हणा. मला फरक पडत नाही. मला तरी फायदा झाला. तुम्ही कधी फायदा करून घेताय?
देश जरूर बदलेगा...पहले खुद से तो शुरूआत कर के देखो...
By Sanket