पंतप्रधान नरेंद्र मोदी. या व्यक्तीसोबत तुमचे कितीही मतभेद असतील, कितीही मोदी द्वेष असेल पण या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली झालेली कामे तुम्ही नाकारु शकत नाही. म्हणजे ती वास्तविकता स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी हवी. आज लोकांना हिशोब हवाय. 60 वर्षांत काय झालं यापेक्षा गेल्या 5 वर्षांत तुम्ही काय केलं. सुदैवाने ही पाच वर्षांची कामाची पोतडी ओसंडून वाहतीय. फक्त ती समजून घेणं व लोकांच्या नजरेस आणून देणं आवश्यक आहे.
मोदी नकोत म्हणून महाआघाडी होतीय. ते पक्ष आम्ही विकास करू यापेक्षा मोदी नकोत या नकारात्मकतेने एकत्रित येतायत. पण आपण कोणती महत्त्वाची कामं झाली त्यावर चर्चा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी हवे आहेत. पण का? ते माझ्या विचारांसोबत जुळणाऱ्या पक्षाचे नेतृत्व करतात म्हणून? ते आक्रमक नेते आहेत म्हणून? वास्तविक पाहता ते मला पंतप्रधान हवेत किंवा नाही याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांचं नेतृत्व देशासाठी का महत्त्वाचं आहे? याचा मागोवा त्यांच्या कामांचा आढावा घेतल्यावर आपल्याला मिळू शकेल अशी मला खात्री आहे. म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक लेखांमधून त्यांनी घेतलेले निर्णय व त्याचे परिणाम याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. मोदीच पंतप्रधानपदी हवे आहेत एवढे सांगून भागणार नाही तर ते का हवे आहेत याची कारणं काय हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर नुसतं मोदी-मोदी करण्यापेक्षा ते अधिक संयुक्तिक ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या काही ठळक कामांवर आपण संक्षिप्त स्वरूपात दृष्टीक्षेप टाकणार आहोत. कुठलंच सरकार केवळ 5 वर्षांत सर्वच समस्या सोडवू शकत नाही. पण किमान काम करण्याची वृत्ती, इच्छाशक्ती आणि हातोटी हवी. या सरकारचे प्रयत्न व कामाचा झपाटा पाहता आपल्याला देखील जाणवेल की यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हवी. चला तर मग, पुढील भागापासून काही ठळक योजना/घटनांचा आढावा घेऊया.
By Sanket...
Stay connected...
