Saturday, 6 April 2019

पुन्हा मोदींनाच मत देण्यास कारण की..- भाग-4


स्वच्छ भारत- एक पाऊल स्वच्छतेकडे

स्वच्छ भारत. नाव तसं सकारात्मक आहे. पण त्या सकारात्मकतेला देखील शोकांतिकेची झालर आहे. स्वातंत्र्याच्या 67 वर्षांनंतर देखील एखाद्या देशाच्या पंतप्रधानांना टॉयलेट बांधण्याची योजना आणावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काय? पण गेल्या 60 वर्षांत काय झालं यावर खडी फोडायची आज वेळ नाही. पण तरीही योजनेची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या घरात टॉयलेट नसेल त्या घरातील महिला व वृद्ध व्यक्तींची काय अवस्था होत असेल? या योजनेची घोषणा केल्यावर गेल्या 5 वर्षांत नेमकी अंमलबजावणी कशी झाली यावर चर्चा करायची आज वेळ आहे.

'स्वच्छ भारत' ही नेमकी काय योजना आहे?

1. महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी अर्थात 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत' या योजनेची घोषणा केली.
2. देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्या माध्यमातून आणि शहरी भागात नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते.
3. टॉयलेट्स बांधणे हा योजनेचा एक भाग असून, लोकांना स्वच्छाग्रही बनविणे हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे.
4. टॉयलेट्स तर बांधून होतीलच पण स्वच्छतेचा आग्रह धरून लोकांना जागरूक करून स्वच्छतेच्या या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेणं, हे मुख्य उद्दिष्ट आहे.

स्वच्छ भारतचं नेमकं फलित काय?

1. योजनेची घोषणा झाल्यापासून 2 एप्रिल 2019 पर्यंत म्हणजेच केवळ 54 महिन्यांत 9 कोटी 79 लाख 75 हजार 780 टॉयलेट्स बांधून झाली आहेत.
2. सरासरी बघितली तर संपूर्ण देशभरात प्रत्येक दिवसाला सुमारे 60 हजार टॉयलेट्स सरकारने या योजनेअंतर्गत बांधली.
3. नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला तर लक्षात येतं की स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढलीय.
4. कोणतंही सरकार योजनांची अंमलबजावणी करत असतं तेव्हा लोकसहभाग अत्यंत मोलाची भूमिका बजावत असतो, त्यामुळं लोकांचं जागरूक असणं खूप गरजेचं आहे.
5. टॉयलेट्समुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहून जीवनमान उंचावलं, ही खूप मोठी उपलब्धी आहे.
6. आज लोकं स्वच्छतेविषयी केवळ चर्चा न करता त्या मोहिमेत सहभागी होत आहेत हे 'स्वच्छ भारत'चं सगळ्यात मोठं यश आहे.

एक-एक पाऊल पुढं स्वच्छतेच्या दिशेने टाकत इतक्या सकारात्मकतेने आणि वेगवानपणे योजना राबवून भारताला खऱ्या अर्थाने 'स्वच्छ' बनविण्यासाठी झटणाऱ्या मोदी सरकारलाच माझं पुन्हा एकदा मत. आणि तुमचं??

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...