Wednesday, 22 July 2020

फडणवीसांचा झंझावात


महाराष्ट्रात अनैतिक सत्तांतर झाल्यावर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील कल्याणकारी योजनांना स्थगिती दिल्यावर 'फडणवीसांना दणका' ही टॅगलाइन माध्यमांनी खूप गाजवली होती. पण फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाल्यावर अननुभवी सरकारला आव्हान उभं करतील असं त्यांच्या राजकीय विरोधकांनी देखील खासगीत मान्य केलं होतं. आव्हान तर फडणवीसांनी निर्माण केलंच आहे, पण त्यासोबतच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी नेमकं काय काय केलं यावर एक ठळक गोष्टींवर नजर फिरवूया. त्यांचा कामाचा आवाका पाहता त्याला झंझावातच म्हणावं लागेल.
'आप क्रोनोलॉजी समझिए'..

● नागपूरच्या 1000 भाजप कार्यकर्त्यांसोबत जनतेला मदत करण्यासंदर्भात संवाद (26 मार्च)

● महाराष्ट्रातील भाजपच्या खासदार, आमदार, महापौर, जिल्हाध्यक्षांसोबत जनतेला मदत करण्यासंदर्भात संवाद (27, 28 मार्च, 3 एप्रिल)

● महाराष्ट्रातील भाजपच्या नगरसेवकांसोबत जनतेला मदत करण्यासंदर्भात संवाद (2 व 5 एप्रिल)

● नागरिकांच्या समस्या, कोरोना योद्ध्यांच्या अडचणींबाबत राज्यपाल महोदयांची भेट (8 एप्रिल)

● 'बेस्ट'च्या बसचालक, वाहकांसाठी 20 हजार तसेच फेरीवाले, रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी 50 हजार किटचे वाटप (11 एप्रिल)

● सिनेसृष्टीतील कामगारांसाठी 3 हजार किटचे वाटप (11 एप्रिल)

● औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद (15 एप्रिल)

● भारतीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित कोरोना नंतरची आव्हाने व संधी या चर्चसत्रात संबोधित केलं (16 एप्रिल)

● सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून त्या क्षेत्रातील आव्हाने व उपाययोजना यासंदर्भात संवाद साधला (17 एप्रिल)

● वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या (20 एप्रिल)

● बुद्धिजीवी व्यक्तींसोबत चर्चा (21 एप्रिल)

● स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद (22 एप्रिल)

●  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससोबत संवाद साधून समस्या व आगामी काळातील आव्हाने यावर मतं जाणून घेतली (23 एप्रिल)

● विविध क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत संवाद साधला (25 एप्रिल)

● क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या (27 एप्रिल)

● माध्यमांवरील दबाव व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी बद्दल राज्यपाल महोदयांची भेट घेऊन निवेदन दिले (28 एप्रिल)

● कृषी क्षेत्रातील कोरोना दरम्यानच्या व नंतरच्या समस्यांबाबत केंद्रीय कृषी राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्यासोबत जाणकार व्यक्तींशी संवाद साधला (28 एप्रिल)

● रिअल इस्टेट संदर्भात 'नरेडको' संस्थेच्या मान्यवरांसोबत संवाद (28 एप्रिल)

● जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्थांमधील चांगल्या गोष्टींबद्दल उद्योग जगतातील मान्यवरांसोबत संवाद (29 एप्रिल)

● माजी सैनिकांसोबत संवाद (30 एप्रिल)

● अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद (1 मे)

● भाजपचे राज्यातील खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला (3 मे)

● नाट्य व चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसोबत संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले (3 मे)

● राज्यातील वकिलांसोबत संवाद साधला (4 मे)

● चार्टर्ड अकाउंटंट यांच्या संघटनेसोबत संवाद (4 मे)

● विविध कामगार संघटनांसोबत संवाद (5 मे)

● स्थलांतरित कामगारांचा राज्यांतर्गत प्रवास मोफत करावा यासाठी राज्य सरकारला विनंती (11 मे)

● नागपूर येथे भाजपतर्फे सुरू असणाऱ्या सेवा कार्यात सक्रिय सहभाग (14,15,16 मे)

● आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायासोबत संवाद साधून त्यांचे नियोजन व भावना समजून घेतल्या (16 मे)

● बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करू नये यासाठी त्यांच्या कामगार नेत्यांना विनंती केली (18 मे)

● मुंबईतील रुग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेसंदर्भात राज्य सरकारने डॅशबोर्ड तयार करावा जेणेकरून रुग्णांचा वेळ वाचेल अशी विनंती राज्य सरकारला केली (18 मे)

● महामहिम राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली (19 मे)

● 'आत्मनिर्भर भारत' योजना सोप्या शब्दांत मांडणारे व्हिडीओ (21-25 मे)

● आदिवासींच्या आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. तसंच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली (1 जून)

● संयुक्त अरब अमिरातीत असलेल्या मराठी बांधवांसोबत संवाद (5 जून)

● कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला (5 जून)

● कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना भाजपच्या वतीने मदत रवाना केली (8 जून)

● बांधकाम व्यावसायिकांची संघटना -क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत चर्चा (9 जून)

● नाभिक समाज, सलून व वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींसोबत चर्चा (9 जून)

● निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 2 दिवसांचा कोकण दौरा (11-12 जून)

● आत्मनिर्भर भारत संदर्भात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला (15 जून)

● कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधून निसर्ग चक्रीवादळानंतरच्या मदत कार्याचा आढावा घेतला (20 जून)

● बोगस बियाणांच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद (30 जून)

● 'आत्मनिर्भर महाराष्ट्र- आत्मनिर्भर भारत' हे स्वलिखित पुस्तक प्रकाशित केले. महाराष्ट्राला होणारा फायदा याचे सोप्या शब्दांत विश्लेषण केले आहे. (4 जुलै)

● साखर उद्योगाच्या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली (17 जुलै)

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबद्दल प्रत्यक्ष भेटून माहिती दिली (17 जुलै)

● मुख्यमंत्र्यांना पत्र
◆ ICMR चे निकष पाळून कोरोना चाचण्या करण्याबाबत (19 एप्रिल)
◆ कोरोना संशयितांचे मृतदेह परस्पर सोपवण्याचे प्रकार थांबवण्याबाबत (21 एप्रिल)
◆ अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उद्योगांना सूट देण्याबाबत (24 एप्रिल)
◆ शेतमाल खरेदी केंद्र सर्वत्र व मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची मागणी (25 एप्रिल)
◆ पत्रकारांवरील हल्ल्यांबाबत (20 मे)
◆ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक घेण्याबाबत (24 मे)
◆ प्राथमिक सुविधांची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या पोलीस हवालदार यांची बदली रद्द करण्याबाबत (30 मे)
◆ आदिवासी बांधवांचे आंदोलन व न्याय्य मागण्यांबाबत (31 मे)
◆ कोरोना मृत्यू नैसर्गिक भासवले जात असल्याबाबत (4 जून)
◆ कोकण दौऱ्यानंतर तेथील परिस्थिती व उपाययोजना याबद्दल (13 जून)
◆ अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याबाबत (18 जून)
◆ घरगुती तसेच उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात वीज शुल्क आकारले जात असल्याबद्दल (22 जून)
◆ निकृष्ट बियाणांबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत (22 जून)
◆ मुंबईतील 1000 कोरोना बळी न दाखवल्याबाबत (25 जून)
◆ कोरोनाबळींच्या संख्येत होत असणारे बदल याचा आढावा विशद करत त्यावरील उपाययोजनांबाबत (26 जून)
◆ मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, मृत्यूसंख्येची न होणारी पडताळणी, मृतदेहांची न होणारी कोरोना चाचणी याबद्दल (2 जुलै)
◆ पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा निधी महाराष्ट्राला देण्यासाठी केंद्राचा पुढाकार पण राज्याकडून प्रस्ताव सादर करण्यास विलंब होत असल्याबद्दल (7 जुलै)
◆ बहुतांश कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यावर आढळलेली निरीक्षणे व उपाययोजनांबद्दल (13 जुलै)
◆ कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका यांचे वेतन वेळेत मिळावे याबाबत (18 जुलै)

● महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला
◆ नागपूर (14 मे)
◆ नेस्को, मुंबई (1 जून)
◆ पुणे, पिंपरी चिंचवड (22-23 जून)
◆ सोलापूर (24 जून)
◆ अकोला, अमरावती (29 जून)
◆ नवी मुंबई, पनवेल (4 जुलै)
◆ भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर (5-6 जुलै)
◆ नाशिक, मालेगाव (8 जुलै)
◆ जळगाव, औरंगाबाद (9 जुलै)

विरोधी पक्षात असताना देखील फडणवीस यांच्यातील कुशल प्रशासक पुढे येऊन विविध क्षेत्रातील लोकांसोबत संवाद साधत व जनतेच्या मदत कार्यात उतरले हे वाखाणण्याजोगे आहे. विद्यमान राज्य सरकारच्या कालच्या निर्णयाने फडणवीसांचे दौरे, बैठका रोखता येतील पण त्यांचा झंझावात कधीच रोखू नाही शकणार. कोणत्याही महाविकास आघाडी समर्थकाला या लेखाला विरोध करायचा असेल तर त्याने मुद्देसूद प्रतिवाद करावा. अर्थात त्यांच्या नेत्यांनी तेवढी कामे केली नसल्याने ते लंगड्या समर्थनापेक्षा काहीच वेगळं करू शकणार नाहीत.

फडणवीसांचा झंझावात पाहिला तर वाटतं-
सत्ता छोड़नी पड़ी पर मैदान नहीं छोडूंगा,
विपक्ष में रहकर भी समस्याओं से जंग लडूंगा,
उम्मीद से देखती हुई जनता को निराश नहीं करूंगा,
जहां भी रहूंगा, आपके सहयोग के लिए हाजिर रहूंगा

मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐
तुम्ही लवकरच पुन्हा यावं...

2 comments:

  1. Excellent ! Action speaks louder than words.

    ReplyDelete
  2. खर तर त्याच पक्षाचा नविन मुख्यमंत्री झाला रे झाला की माजी मुख्यमंत्री स्वतःहून अडगळीत जातो किंवा टाकला जातो.ईथे मात्र आजी मुख्यमंत्र्यापेक्षाही माजी मुख्यमंत्री जास्त कार्यक्षम व कार्यतत्पर दिसून येतोय.कारण एकच आहे सत्ता ही माव्यासाठी आहे हे तत्व आत्ताचे मुख्यमंत्री अवलंबिताना दिसतात.

    ReplyDelete

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...