Friday, 26 May 2017

तीन साल...विरोधकांचं नैराश्य बरकरार...

नैराश्य म्हणजे काय ते सध्याच्या विरोधकांना पाहिलं तर सहज लक्षात येईल. यांचं वागणं बघितलं तर असं वाटतं की हे लोकं अजून त्या 2014 च्या निकालातून सावरलेच नाहीयेत. त्यामुळं शहाणं होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. 2014 चे निकाल अनपेक्षित होते खरे. पण ते स्वीकारून (पचवून) कामाला लागणं अपेक्षित होतं. ते झालं नाहीये आणि पुढची काही वर्षे ते होईल असंही वाटत नाही.
कांग्रेस हा देशातला सर्वांत जुना प्रमुख पक्ष. सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेला पक्ष. राष्ट्रीयराजकारणाचा विचार केला तर असा कल दिसतो की आजवर केली तशी व्यक्तिपूजा करायलासुद्धा लोक तयार होतील. पण तो विश्वास लोकांना द्यायला लागतो. मग त्याला 'जुमला' म्हणा किंवा 'गाजर' म्हणा. तो विश्वास दाखवण्यात सुद्धा जर आपण कमी पडत असलो तर आपण निरुपयोगी आहोत. या पक्षात अनेक गुणी नेते आहेत. पण यांना पुढं येऊ दिलं जात नाही. पण त्याच नेत्यांना घराणेशाहीचं गुणगान गावं वाटतं हे दुर्दैवच आहे. अध्यक्षपदाची सूत्र घ्यायला विजयाचा मुहूर्त शोधत आहेत. पण सगळीकडे पराभवच नशिबी येत आहेत. (आता मालेगाव भिवंडी मनपा जिंकली आहे. सूत्र घ्यायला हरकत नाही). विरोधकांच्या चालींचा अभ्यास करायचा असतो. इथं फक्त नाव घेऊन टीका करत असतात. त्यामुळं ते नाव प्रसिद्ध व्हायला मदतच होते. पण या पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं कौतुक आहे की नेतृत्व तगडं नसतानाही ते एकाकी लढत देतात. पण दुःखही तेवढंच आहे की टुकार नेत्यांसाठी आपण वेळ वाया घालवतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
बाकी विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीशकुमार हे एक चांगले विरोधक आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर ते चांगली टक्कर देऊ शकतील. पण त्यांच्या पक्षाची ताकद मर्यादित असल्यानं अडथळे आहेत. संयमी तसंच विकास हे मिश्रण लागतं ते पुरेपूर आहे त्यांच्यात.
आक्रस्ताळेपणा म्हणलं की दोन नावं आपसूकच समोर येतात. तृणमूल काँग्रेस आम आदमी पक्ष. दोघातला फरक हा आहे की TMC अजून जनाधार टिकवून आहे आप नाही. या लोकांच्या राजकारणाची दिशा यांनाच स्पष्ट नाही तर हे दुसऱ्यांना काय स्पष्ट करणार हा एक मोठाच प्रश्न आहे.
सपा बसपा यांना तर 'यूपी'च्या निकालांनी पूर्णपणे गलितगात्र केलं आहे. प्रत्येकवेळी केंद्र सरकारला आपल्या खासदारांच्या जीवावर नाचवायचं हा ठरलेला उद्योग. पण आता ते ही दुकान बंद झालं. त्यामुळं पुढच्या निवडणुकांची वाट पाहण्या पलीकडं काहीच हातात नाही.
दक्षिणेचा विचार केला तर AIDMK आता निर्नायकी झाला आहे. DMK चं सुद्धा तसंच आहे.
यामुळं असं झालंय की सत्ताधारी पक्षाला प्रबळ विरोधकच नाही. त्यामुळं त्यांचं जास्तच फावतंय असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. हे नैराश्य झटकून दुसरा सक्षम पर्याय दिला पाहिजे. विरोध करताना काहीतरी ठोस कार्यक्रम लागतो. मुद्दे, अभ्यास सगळंच लागतं. नेमका याचाच अभाव असल्यामुळं एका मागोमाग एक पराभव पदरी येत आहेत. आजचं सरकार चुकलं तरी सक्षम पर्याय नसल्यानं विरोधकांना यश येत नाहीये. यापुढं तरी आपल्याला चांगले अभ्यासू विरोधक पाहायला मिळतील अशी अपेक्षा करू. हे नैराश्य पाहण्याचा जनतेलाही कंटाळा आलाय. पण ती नस ओळखणारा नेता पाहिजे.

No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...