कन्हैय्या कुमारचं परवाचं पुण्यातलं वक्तव्य.
संघ काठी आणि चड्डी सहित कसं लढणार?
संघ काठी आणि चड्डी सहित कसं लढणार?
संघानं फुल पँट केलेली माहीत नसावं बहुतेक याला. आपलं कर्तृत्व काय, आपण बोलतोय काय? असो. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते बघूया.
पुण्यात एक चर्चासत्र आयोजित केलं होतं म्हणे. पुनावाला बिनावाला मंडळी पण होती. विषय होता की 'संविधान की संघ'. मुळात हा काही चर्चेचा विषय आहे का? ज्यांना या दोन्हीतला फरक कळत असेल ते असले विषयच चर्चेला घेणार नाहीत. संविधान हे देशाचं सार्वभौम आहे. ती एक कायदेशीर वाट आहे ज्या वाटेवरून चालायचं आहे. त्याला आपण घटना असंही म्हणतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक प्रखर देशभक्ती असणारी संघटना आहे. आता साधी गोष्ट आहे की घटना आणि संघटना या दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही. तरीही लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी हा एक केविलवाणा प्रयत्न केला गेला. पण लोकांचा बुद्धिभेद होऊ नये यासाठी या गोष्टीचा समाचार घेणं आवश्यक आहे.
या कन्हैया कुमार सारख्या टुकार लोकांचा समज आहे की संघाला आपली विचारसरणी या देशावर लादायचीय. सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संघानं स्वतःच देशभक्तीची विचारसरणी अंगिकारली आहे. त्यामुळं तुमच्यात देशभक्ती असेल तर संघानं काही लादायचा प्रश्नच येत नाही. स्वतःच्या घरच्यांना न विचारणाऱ्यांना देशप्रेम काय कळणार? संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्ची घातलं आहे. काहींनी तर स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आहे. खूप उदाहरणं आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून बघायची गरज आहे. संघ कधीही सरकारी अनुदानावर जगलेला नाही. उलट संघ सगळं स्वतः गोळा करतो (गुंडगिरी करून नव्हे) अथवा सगळं आपसूकच संघाकडं येतं. मग ती माणसं असू देत किंवा पैसा. संघ मुख्यत्वे माणसांवर चालतो. पैशावर नव्हे. संघाची तत्व तर स्वतःचीच आहेत. त्यामुळं भाडोत्रीपणा कसलाच नाही.
आता ही कन्हैय्या कुमार वाली जत्रा काय करते ते बघूया. असे अनेक कन्हैया आहेत जे सरकारी अनुदानाच्या जीवावर केंद्रीय संस्थांमध्ये डेरा टाकून बसले आहेत. जर सरकारनं हटवायचा प्रयत्न केला तर हे जातीची कार्ड घेऊन बसले आहेतच. उद्या जाऊन जीव देणार आणि खापर सरकारच्या माथी. ते हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या प्रकरण पण त्यातलाच एक प्रकार. त्या मुलानं आत्महत्या केली तेव्हा त्याच्या मित्रांनी पोलिसांना मृतदेह दाखवायला अनेक तास लावले. त्यामुळं ही कसली बांडगुळं पोसली जात आहेत याची कल्पना येऊ शकते. पुण्याच्या FTII मध्ये पण तेच. 3-5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 8-10 वर्षे ठाण मांडून बसणारी जत्रा आहे तिथं. अभ्यास करा आणि वेळेत बाहेर पडा. नसत्या उठाठेवी सांगितल्यात कोणी? ते ही सरकारी अनुदानावर? असल्या लोकांना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तरीही हे लिहायचं कारण म्हणजे लोकांना चांगलं आणि वाईट काय ते कळावं हा प्रामाणिक प्रयत्न.
एवढंच सांगेन की लढायला हत्यारं लागतात त्यापेक्षाही ती वापरायची बुद्धी लागते. कपड्यांवर काही नसतं. सगळीच माणसं या जगात विवस्त्र येतात आणि विवस्त्रच जातात. फक्त असलेली बुद्धीच शेवटपर्यंत सोबत करते.

संदर्भ - मी संघाच्या अनेक लोकांचं dedication पाहिलंय. कामाशी त्यांची कमिटमेंट कशी असते ते पाहिलंय. आदर्श घेण्यासारखा आहे. ते जमणार नसेल तर किमान चांगल्याला चांगलं म्हणायला शिकू. मापं काढणं तर
कोणालाही जमतं.
No comments:
Post a Comment