सर्वप्रथम आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे पुन्हा विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांचेही अभिनंदन. पुदुच्चेरीमध्ये एनडीए जिंकल्यात जमा आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. पश्चिम बंगालमध्ये ज्या भाजप कार्यकर्त्यांना पक्ष कार्य करताना मृत्यू आला त्यांना विनम्र अभिवादन.
आजचा मुद्दा हा आहे की भाजप सत्तेत होता आणि पराभूत झालाय असं आज कोणतंच राज्य नव्हतं. तामिळनाडू येथे केवळ आघाडीचा घटक होता पण सत्तेत सहभागी नव्हता. परंतु मीडिया मधून भाजप हरल्याची धून जाणीवपूर्वक वाजवली जात आहे. अर्थात मीडियाने काय दाखवावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण पत्रकारिता म्हणजे कोणाचे गुलाम न होता तटस्थपणे वार्तांकन करणे अपेक्षित असते. ना काँग्रेस ना भाजप कोणाचीच तळी उचलू नयेत. बाजू मांडायला अधिकृत प्रवक्ते/कार्यकर्ते असतात. पण भाजपविरोध हे एककलमी काम करताना पत्रकारितेतील एक मोठा वर्ग दिसतो.
आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी भाजपविरोधी मीडियाने या पाच राज्यामधील निवडणूक आणि आता निकाला दरम्यान दाखवलेल्या नाहीत. कारण आजचा सगळा फोकस नेमक्या विश्लेषणापेक्षा भाजपला पश्चिम बंगाल येथे न मिळालेल्या बहुमतावर होता.
आज पक्षपाती पत्रकारांनी न दाखवलेल्या गोष्टी-
1. काँग्रेसचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार व माजी तसेच भावी अध्यक्ष खासदार असलेल्या केरळ राज्यात एक तृतीयांश जागा मिळवता आल्या. तसेच काँग्रेसचा यावेळी केरळ विधानसभेत झालेला हा सलग दुसरा पराभव आहे. यावेळी राहुल गांधी तेथून खासदार असताना देखील जागांमध्ये घट झाली आहे.
2. काँग्रेसची सत्ता असलेल्या पुदुच्चेरी येथे काँग्रेसचा पराभव झाला. एकेकाळी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असणारे व्ही. नारायणसामी हे मुख्यमंत्री होते. त्यांना उमेदवारी देण्यात आली नसली तरी हे काँग्रेसच्या मर्जीतील राज्य होतं.
3. तामिळनाडू येथे 'डीएमके'चा झालेला विजय हे केवळ प्रादेशिक समीकरण आहे. त्यात काँग्रेसचा चिमूटभर देखील काहीच वाटा नाही. याचं कारण जर खुद्द केरळमध्ये राहुल गांधींचा करिष्मा चालत नसेल तर तामिळनाडू मध्ये कसा चालत असेल?
4. आसाम येथे देखील काँग्रेसने केरळ प्रमाणेच सलग दुसऱ्यांदा पराभव करून घेतला आहे.
5. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला डच्चू दिल्यानंतर त्यांनी डाव्यांसोबत सोयरीक केली. बंगालमध्ये एकत्र आणि केरळमध्ये विरोधात असं विचित्र मेतकूट आहे. एवढा खेळ करून आज दोघांचाही धुव्वा उडाला.
6. पंढरपूर येथे महाविकास आघाडीने विशेषतः 'राष्ट्रवादी'ने प्रचंड प्रमाणात ताकद लावली होती. पण तरीही त्यांचा सहानुभूतीच्या लाटेत देखील पराभव झाला. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार तिथं ठाण मांडून होते. पण स्थानिक समीकरण आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांना भारी पडले.
आता गोष्टी कोरोनाच्या-
1. कोरोनाचा प्रसार तेव्हा होत नव्हता जेव्हा राष्ट्रवादीने पंढरपूरात ढीगभर मेळावे घेतले.
2. ज्या दक्षिण भारतात भाजपला कमावण्यासारखं विशेष काही नव्हतं तिथलं मतदान होईपर्यंत कोरोनाबद्दल काहीच अडचण नव्हती.
3. साधारण 1 एप्रिल 2021 रोजी ज्या राज्यात निवडणुका होत्या तिथली कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या लोकांची त्या आठवड्यातील अंदाजे सरासरी पुढे देत आहे.
तामिळनाडू- 2324
पुदुच्चेरी-141
केरळ-2212
आसाम-47
बंगाल- 830
4. निवडणुकांमुळे कोरोना वाढला असेल तर हा साक्षात्कार दक्षिणेतील राज्यांचं मतदान होण्यापूर्वी कुठं गेला होता?
5. आज बंगालमध्ये तृणमूल जिंकल्याने काही पत्रकारांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत होता त्याचा अविर्भाव जणू काही कोरोना वाहून गेला असाच होता. ममतांना हे यश प्रचारसभा न घेता मिळाले का? पण प्रॉब्लेम फक्त भाजपमुळे होता हे लक्षात घेतलं पाहिजे.
6. बाकी आसाम आणि पुदुच्चेरी वगळता इतरत्र विजेत्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून विजयाचा जल्लोष केला असेल तरी या पक्षपाती मीडियाला ती सोयीची बातमी वाटली नसेल.
7. आता पश्चिम बंगाल येथे तर उन्माद सुरू असून भाजपच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रकार घडला. त्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे कान टोचणार का?
8. आता ममता बॅनर्जी यांच्यासाठी सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यावेळी कोरोनाची आठवण होणार का?
9. बेळगाव येथील लोकसभा पोटनिवडणुकीत खासदार संजय राऊत तसेच शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते प्रचारासाठी गेले होते. खरंतर एखाद्या घरातील मतं तरी ते खेचू शकले असतील का नाही याबद्दल शंकाच आहे. यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही तर कर्नाटकमध्ये यांच्याकडे पाहून कोण मतदान करेल? जे लोक महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी काही करू शकले नाहीत तर ते दुसऱ्या राज्यातील मराठी लोकांसाठी काय करणार? त्यामुळे त्यांनी जी गर्दी जमवली त्यात कोणाला कोरोना दिसला नाही का?
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला असता तर-
1. ईव्हीएम मध्ये गडबड आहे, आज एकही अक्षर नाही याबद्दल.
2. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग झाला, पण आज तृणमूलच्या विजयात किती गुंडागर्दी झाली याचा हिशोब मांडणार का?
3. ममता बॅनर्जी यांनी वापरलेली संपूर्ण प्रचारात व्हील चेअरचा वापर केला. त्यांना खरेच दुखापत झालेली असू शकते. त्यावर काही मला टिप्पणी करायची नाही. पण हेच जर भाजपच्या कोणत्या नेत्यांना दुर्दैवाने व्हील चेअर वापरावी लागली असती आणि मग भाजपचा विजय झाला असता तर भाजपला व्हील चेअरने जिंकवले असाही अजेंडा राबविण्यात आला असता.
मुद्दा इतकाच आहे की तथाकथित ढोंगी पत्रकारांचा पुरोगामीपणा हा केवळ काँग्रेस आणि डाव्यांची गुलामी करण्यापर्यंत किंबहुना फक्त भाजप विरोध करणे इथंपर्यंतच सीमित असल्याने त्याची झलक अशा टुकार वार्तांकनातून दिसते. आम्ही भाजपचे कार्यकर्ते असलो तरी भाजपचं जिथं चुकतं ते जरूर सांगा. पण केवळ भाजपचं चुकतं अशा अविर्भावात नेहमी वागायचं असंही नाहीये ना. बाकी निष्पक्ष पत्रकारांबद्दल आदरच आहे. त्यांनी हा ब्लॉग जिव्हारी लावून घ्यायचं कारण नाही. पण जर जिव्हारी लागत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असो. पुन्हा जेव्हा जेव्हा असं काही घडेल तेव्हा याचा पुढचा भाग लिहिण्यात येईलच. आपल्या वागण्याने आपला संपूर्ण व्यवसायच आणखी बदनाम होत नाही ना एवढी काळजी वाटली तरी खूप झालं. तूर्तास आपण पत्रकार आहोत की भाजप विरोधी अनधिकृत प्रवक्ते याचा ठाव घ्यावा आणि निष्पक्षपणे वार्तांकन करावे. नाहीतर कालांतराने आपण निष्प्रभ ठराल हे मात्र नक्की.

पत्रकारिता ही बदनामीच्या चरम सिमेवर आहे. जर पत्रकारिता सत्य पचवू शकत नसेल, तर ते नागरिकांकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवतातच कसे?? हा महत्वाचा प्रश्न आहे. कोरोनामुळं तरी त्यांनी शुद्धीवर यावंं ही परमेश्वर चरणी प्रार्थना...
ReplyDeleteVery common questions common man can ask to uncommon people in the media .
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहे. प बंगालमध्ये ३ वरून ७५ तर आसामचा गड राखणे आणि पुद्दुचरीमध्ये सत्तापरिवर्तन हा भाजपचा विजय नाही तर काय आहे ? केरळ आणि तामीळनाडू बाबतीत बीजेपी चा काही प्रश्नच नव्हता व तेथे पक्षाने फार मोठ्या अपेक्षाही ठेवला नव्हत्या. एकंदरीत जेवढा मिळालेला विजय आहे तेवढा विजय आपण साजरा केलाच पाहिजे असे मला वाटते ---- प्रल्हाद कुलकर्णी
ReplyDeleteExactly explained 👍👍
ReplyDeleteखूप सुंदर विश्लेषण केलं आहे. खरंच भाजपाचे विरोधक गोदी मीडिया हे कुठल्या अनुषंगाने म्हणतात यावर विचार करण्याची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळतो आहे हे निश्चित.
ReplyDeleteअतिशय मार्मिक विश्लेषण.
DeleteGood information 👍🙏
ReplyDelete