Sunday, 23 May 2021

महा'मुस्कटदाबी'

 


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नव्हे तर महा'मुस्कटदाबी'चे सरकार सत्तेवर आहे. काँग्रेसला मुस्कटदाबीचा जुना इतिहास आहे. राष्ट्रवादी हा त्यांच्यातूनच फुटलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता काही वेगळी असण्याचं कारण नाही. शिवसेना तर भरकटलेला पक्ष असल्याने कधीही जाऊ शकेल अशी सत्ता वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर जानेवारी ते जून 2020 दरम्यान केवळ मुंबईत 1057 गुन्हे घडले होते. जुलै 2020 पर्यंत केवळ 80 गुन्हे उघडकीस आले होते. सायबर सेलचा दुरुपयोग करायला सरकारला वेळ आहे. मात्र गुन्हे उघडकीस आणायला नाही. यामध्ये पोलिसांचा काडीचाही दोष नाही. त्यांना आदेश देणाऱ्या लोकांचीच नियत साफ नाहीये त्याला बिचारे पोलीस तरी काय करणार. थेट मुद्द्यांवर बोलू. हिंमत असेल तर बाकी फालतू चर्चा करण्यापेक्षा त्यावर प्रतिवाद करा. 'आप क्रोनोलॉजी समझिए'


1. अनंत करमुसे नामक व्यक्तीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्र पोस्ट केल्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. मुळात त्या पोस्टचे समर्थन कोणीच करणार नसले तरी ती मारहाण त्याहून आक्षेपार्ह आहे. पोस्टने मंत्र्यांचा जीव गेला नसता, नाहीये. पण त्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा जीव जाऊ शकला असता. पण करमुसेंनी आरोप केल्यावर मंत्र्यांची साधी चौकशी झालेली नाही. ही करमुसेंची 'मुस्कटदाबी'च होती. इथं सोशल मीडियावर साधी पोस्ट केली तर नोटिसा येत आहेत. काही वेळा तर पोलीस नोटीस न देताही ताब्यात घेऊन अटक करत आहेत.


2. लॉकडाऊनचे नियम मोडले म्हणून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारने वाधवान यांना पास देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांना क्लिनचीट दिली. या सरकारची चलाखी बघा, सुरुवातीला प्रकरण अंगाशी येतंय म्हणल्यावर अमिताभ गुप्ता हे भाजपचे निकटवर्तीय असल्याची अफवा उठवण्यात आली. सर्वसामान्य लोकांची 'मुस्कटदाबी' आणि वाधवान-गुप्ता यांच्यासारख्या लोकांचे लाड हेच तर 'साहेबांचे धोरण' आहे ना.


3. अन्वय नाईक प्रकरणात जेवढी तत्परतेनं कारवाई करण्यात आली तेवढी तत्परता सुशांतसिंग राजपूत केसमध्ये व पालघर साधू हत्याकांडात का दाखवण्यात आली नाही? याचं कारण अर्णब गोस्वामी सरकारच्या विरोधात आवाज उठवत होते. एवढ्या एकाच कारणास्तव त्यांना 'उचलण्यात' आलं. सरकारशी संबंधित लोकांवर आरोप झाले म्हणून सुशांतसिंग प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्यात आलं. अर्णब गोस्वामी यांनी सरकारचे दोष दाखवू नये यासाठी त्यांची 'मुस्कटदाबी' करण्यात आली.


4. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबईतील तक्रारीवरून थेट पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. मुळात प्रदीप गावडे यांची सरकारच्या दृष्टीने चूक होती की स्वतः वकील असलेल्या गावडे यांनी महाविकास आघाडीच्या आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या व महिलांना धमक्या दिलेल्या 54 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. तसंच गावडे यांच्यामुळे हिंदूंना सडक्या मनोवृत्तीचे म्हणणाऱ्या शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल झाला होता.याच प्रदीप गावडेंमुळे भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलवावं लागलं होतं. या सगळ्याची परिणती गावडे यांची 'मुस्कटदाबी' करण्यात झाली. गावडे यांनी ज्या लोकांबद्दल आधी तक्रार केली त्यांना काहीही न करता थेट गावडेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं.


एवढं करून जर अजूनही तुम्हांला महाविकास आघाडीचं समर्थन करायचं असेल तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 54 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यावर एक ट्विट केलं होतं. जे नंतर डिलीट करण्यात आलं. मी संबंधित लोकांशी बोललो आहे, काही काळजी करू नका. ही पद्धत असते मंत्र्यांनी वागण्याची? राष्ट्रवादीचे मोहसीन शेख यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. पण अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. तरीही महाराष्ट्र पोलीस कोणासाठी काम करत आहेत असा प्रश्न विचारणारं ट्विट सुद्धा केलं होतं. मुळात पोलिसांनी आपल्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचं काम करायचं असतं, कोणत्या पक्षाचं नव्हे हे यंत्रणा खिशात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कळणारच नाही.

ही तर केवळ ठळक उदाहरणं लिहिली आहेत. या मुस्कटदाबी वर एखादं पुस्तक देखील होऊ शकेल. भाजपच्या लोकांनी पाठपुरावा केला तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल होत आहेत. पण अटकसत्र केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांचं सुरू आहे. हा कोणता कायदा आणि न्याय आहे? महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक होत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांचेच लोक एवढं विखारी लिहिण्यात गुंतलेले आहेत की त्यांना अटक करायचं ठरवलं तर तुरुंग भरायला वेळ लागणार नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कोणती विचारधारा नाही. काँग्रेसचे अध्यक्ष केवळ पंतप्रधान मोदींना बदनाम करणं यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष परमीट बारमलकांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आहेत. शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे तर उंबरठा ओलांडत नाहीत. मग कार्यकर्त्यांनी करावं काय? ते हेच उद्योग करणार. कुठं मोदींचे फोटो मॉर्फ कर, भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या महिलांना धमक्या दे, इत्यादी. भाजप कार्यकर्त्यांनी मात्र आपली पातळी सोडू नये. कारण 'औकात अपनी अपनी'. संसदीय भाषेत टीका करणाऱ्या एकाही भाजप कार्यकर्ता/समर्थकाच्या केसालाही धक्का लागला तर त्याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार असेल. या घटनांनी एवढंच सिद्ध होतंय की महाविकास आघाडी सरकार विरोधी कार्यकर्त्यांना घाबरलेलं आहे. सरकारने ही मुस्कटदाबी त्वरित थांबवावी. अन्यथा पुढील निवडणुकीत मतांच्या रूपाने जनता तुमची महा'मुस्कटदाबी' करेल हे लक्षात ठेवून पुढील उपद्व्याप करावेत. 


भारतीय जनता पक्ष त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. कालच्या घटनेने याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

1 comment:

  1. काल परत नाशिकमधे जितेंद्र भावेंना पोलिसांनी दमदाटी केली आहे....सत्तेची गुर्मी हरामीपणाची आहे. यांना जनताच रस्त्यावर ऊतरुन धडा शिकवेल...

    ReplyDelete

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...