Wednesday, 5 April 2017

"तळीरामांची तळी"

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारूची दुकाने बंद करण्यात आली. आपला देश कायद्यातून पळवाटांसाठी कुप्रसिद्ध आहे. याही वेळी पळवाट काढण्यात आली. शहरातील रस्त्याचा भाग स्थानिक स्वराज्य संस्थेकडं हस्तांतरित करण्याची 'आयडियाची कल्पना' शोधण्यात आली. कायम दळभद्री आणि दरिद्री अवस्थेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था एका पायावर या पळवाटेसाठी तयार झाल्या. यासाठी निरागस कारण काय..तर व्यावसायिकांची काळजी. काळजी असणं काही गैर नाही पण ती कशाची करावी याचं काही भान असावं. व्यवसाय करणं हे गैर नाही पण तो कोणाच्या जीवावर बेतणारा नसावा. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अतिशय धाडसानं दारूबंदी केली. पण अनेक ठिकाणी आजही दारूला प्रोत्साहनाचे प्रकार चालू आहेत. हे नक्की कशासाठी सुरु आहे? हप्ते घ्यायचं नवीन कुरण मिळेल म्हणून का स्वतःच व्यसन अव्याहतपणे सुरु राहावं म्हणून? आजपर्यंतचे दारूचे व अपघातांचे दुष्परिणाम पाहिल्यानंतर तरी आपण तळीरामांची तळी उचलुन आपण काय साधणार आहोत याचं आत्मपरीक्षण करायला हवं.


No comments:

Post a Comment

गर्दी नियंत्रणाचे अडलेले घोडे

  मध्यंतरी महाराष्ट्रात दुर्दैवी अपघात घडला. मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान दोन लोकल शेजारून जाताना त्यातील काही प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर पडून...